Dictionaries | References

चौगुण

   
Script: Devanagari

चौगुण

 वि.  चौपट ; चतुर्गुण . २ चौथा गुण जो शुध्द सत्त्व गुण त्यानें युक्त असा . येती पाणीया मिळोनि जगजेठी । चेंडु चौगुणा खेळती वाळवंटी । - तुगा १३५ . [ चौ + गुण ; सं . चतुर + गुण = पट ; हिं . चौगुना ] चौगुणित - वि . चार पटीनें ; चौपट ; चतुर्गुणित ; चौगुणी . [ सं . चतुर + गुणित = गुणलेलें ; प्रा . चउ + गुणित ] चौगुणी - स्त्री . चौपट . जें कर्म भांडवला सूये। तयाची चौगुणी येती पाहे । - ज्ञा १८ . ७४७ . चौगुणीनें जरि पूर्ण शीतभानूनळा ऐसा तरि कलानिधी वानूं । - र १ . [ चौगुण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP