Dictionaries | References

चिरंजाव

   
Script: Devanagari

चिरंजाव     

 पु. १ पुत्र ; मुलगा . पण आपले चिरंजीव आपणांस उलट लिहिणार नाहीत कशावरून ! - पकोघे . २ पुत्रास , धाकटया भावास , आपल्यापेक्षां कमी वयाच्या मनुष्यास पत्र लिहितांना त्याच्या नांवामागें लावावयाचें उपपद , शब्द . उदा० चिरंजीव गोपाळ यास अनेक आशीर्वाद . ३ अमरपुरुष ; ब्रह्म कल्पापर्यंत जगणार्‍या सात पुरुषांपैकीं प्रत्येक ( अश्वत्थामा , बली , व्यास , मारुती , बिभीषण , कृप , परशुराम हे सत पुरुष चिरंजीव आहेत ). ४ दीर्घायुषी ; फार दिवस वाचणारा ; चिरकाल टिकणारा . तेणें न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गीचे चिरंजीव । - ज्ञा ८ . १५७ . सुश्री सुकीर्ति होईल गतिही बरवीं प्रजा चिरंजीव । - मोअनु ८ . ५ . [ सं . चिर = फार दिवस , दीर्घकाळ + जीव = जगणें , वांचणें ] चिरंजीवी - स्त्री . मुलगी ; कन्या . [ चिरंजीव ] - वि . चिरकाल जगणारा ; दीर्घायुषी . [ चिर + जीविन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP