-
अक्षोट (अक्रोड) कुल, जुग्लँडेसी
-
ह्या द्विदलिकित वनस्पतींच्या लहान कुलाचा अंतर्भाव अक्षोट गणात (जुग्लँडेलीझ) केला जातो, नतकणिशे (लोंबते कणिश फुलोरे) धारण करणाऱ्या वनस्पतींच्या गणात (ऍमेंटिफेरी) पूर्वी समावेश असे, परंतु त्यातील इतर कुलातील वनस्पतींची लक्षणे प्रारंभिक की ऱ्हसित हे विवाद्य आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, एकाआड एक सोपपर्ण पाने, स्वतंत्र फुलोऱ्यावर दोन प्रकारची एकलिंगी फुले, परिदले
-
किंवा ५, नर फुलात ३-४० केसरदले, स्त्री फुलात दोन अधःस्थ जुळलेल्या किंजदलांचा, एक कप्प्याचा व एकच बीजक असलेला किंजपुट, तलयुती (जुग्लॅन्स वंशात)
-
वायुपरागण, कपाली किंवा आठळी फळ, अपुष्क बी.
Site Search
Input language: