Dictionaries | References

चकणें

   
Script: Devanagari

चकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

चकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To be lost in admiration or amazement, to be befooled or tricked. To err, blunder, mistake; also to lose one's way.

चकणें     

क्रि.  १ आश्चर्यांत किंवा कौतुकांत निमग्न असणें ; गोंधळणें ; भांबावणें ; भूल पडणें . त्या शालेचा भडक रंग पाहतांच मी चकलों आणि दोनशें रुपये दिले . मदनें मति त्याचीही क्रीडा चकली । - रास ९ . २ ( ल . ) फसणें . लॉर्ड कर्झन साहेबांच्या राजकीय धोरणासंबंधानें बोलतांना हे चकतील ... - टि २ . ५१४ . ३ भय पावणें ; दचकणें . देखुनी उभयतां चकती ते । भासती जिवन वेंचकती ते । - आनंदतनय नवरसचरित्र . [ सं . चक , चकित ]
चुकणें पहा .
क्रि.  १ ( बायकी ) लपंडाव व छापोच्या खेळांत सर्व मुलींनीं घेर धरून उभें राहून डाव्या उताण्या हातावर उजवा हात पालथा किंवा उताणा मारणें व त्यावरून हार कोणावर तें ठरविणें ; गडी उजविणें . २ गोटया किंवा कवडया यांच्या खेळांत प्रारंभीं खळींत पैसा टाकणें . [ सं . चक्कलन = वाटोळा घेर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP