|
न. एक झाड . हें २० ते ४० फूट उंच वाढतें . याचें पान कडुनिंबा सारखें असून लांकूड फार सुवासिक असतें . याच्या पेटया , पंखे , चित्रें , अत्तरें , तेलें इ० बनवितात . चंदन औषधी आहे . मंदारामल बकुल बिल्व कुट अशोक चंदन जाती । - नरहरि , गंगारत्नमाला ( नवनीत पृ . ४३२ . ) - न . १ या झाडाचें लांकूड , गाभ्याचा तुकडा , खोड . २ ( चंदनाचें ) गंध ; लांकूड उगाळून देवास लावण्यासाठीं करतात तें . ३ ( ल . ) नाश ; धूळधाण ; उच्छेद ; निर्दाळण , सत्यनाश ; नुकसान . ( क्रि० करणें ). पेंढार्यांनीं गांव लुटून चंदन केलें . पोरानें पोळयांचें चंदन करून टाकलें . [ सं . ] ( वाप्र . ) ०उडविणें १ नाश करणें ; उध्वस्त करणें ; चक्काचूर करणें . २ ( व . ) बरोबर नेम मारणें . सामाशब्द - ०काचोळी स्त्री. काचोळीच्या आकाराचा अंगास लावलेला चंदनाचा लेप . चंदन काचोळया रेखिल्या । पाटावांच्या चोळिया । - कालिका पुराण १६ . ४७ . ०चारोळी स्त्री. चंदन वृक्षाचें बीं - बीज . ०बटवा पु. एक पालेभाजी . ही औषधी असून संग्रहणी , कोड , मुळव्याध इ० वर गुणकारी आहे . - योर १ . ४१ . ०हौशी वि. गुलजार ; गुलहौशी ; चैनी ; ऐषाअरामी ; विषयी ; खुशालचंद . चंदनी - वि . चंदन काष्ठाचा , काष्ठसंबंधीचा ( तेल , चौरंग , देव्हारा इ० ). चंदनि वृक्ष तोडावया । तोडावया । - मसाप ( कोंकणीं गाणीं ) २८ . ०अत्तर तेल - न . चंदनाचें जें अत्तर किंवा तेल काढतात तें . यास चंदनेल असेंहि म्हणतात . ०पोपट चंदन्या पोपट - पु . एका जातीचा पोपट ; याच्या गळयावर व पंखांवर तांबडया रेघा व पट्टे असतात .
|