Dictionaries | References घ घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्िग्स Script: Devanagari Meaning Related Words घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्िग्स मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चेतसिंगापासून काशी घेतांना उडालेली वॉरन हेस्तिंग्सची तिरपिट वर्णिली आहे ती इतकी की, कोणा प्राण्यावर काय घालावे याचे त्याला भान राहिले नाही. -केसरी ६-१०-३६. चेतसिंगाला कैद करण्याकरतां वॉरन हेस्तिंग याने काशीतील रेसिडेंट मार्क हॅम यास चेतसिंगाला त्याच्या शिवालय घाटावरील राजवाड्यात जाऊन कैद करण्याचा हुकूम केला. पण राजाच्या प्रजेस ती गोष्ट सहन न होऊन सर्व एकत्र होऊन कंपनीच्या फौजेवर चालून गेले व तिची काशीतल्या गल्लीतून भयंकर कत्तल केली. हे वर्तमान ऐकून हेस्तिंगने त्याच्या मदतीकरितां मेजर पोफॅम यास आणखी फौज देऊन पाठविले व स्वतः वॉरन हेस्तिंग रातोरात पळून गेला. या प्रसंगामुळे काशीत वरील म्हण पडली-पं. भाऊशास्त्री वझे, ‘माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास’ पान २८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP