-
पु. १ भिन्न जातींच्या अनेक पदार्थांचें मिश्रण ; मिसळ ; सरभेसळ ; भेदभावराहित्य . २ अशा प्रकारें अनेक पदांर्थ , वस्तू एकत्र होऊन बनलेला पदार्थ , जाति इ० . ( समासांत ) वर्णसंकर ; जातिसंकर . [ सं . ] संकर अलंकार - पु . ( साहित्य ) दोन किंवा अधिक अलंकार एकाच पद्यांत आले असतां त्यास संकर अलंकार म्हणतात . याचे अंगांगीभाव किंवा मुख्य गौणभाव संकर , संदेहसंकर आणि एकप्रतिपाद्य किंवा एकवाचकानुप्रवेशरूप संकर असे तीन प्रकार आहेत . संकरजाति - स्त्री . ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र या चार जातींतील अनुलोम विलोम अशा प्रकारच्या संबंधांपासून उत्पन्न झालेली जात .
-
ना. भिन्न बीजपेशींचे मिश्रण ;
-
ना. भिन्न गोष्टींचे मिश्रण , मिसळ , सरभेसळ .
-
m Confusedly mixing. Tumultuous intermixture, a medley, a hotchpotch.
Site Search
Input language: