-
स्त्री. १ श्लेष्मा ; शेंबूड ; नाकांतून होणारा स्त्राव २ आंतडयांतील मळ , स्त्राव , विष्टा ; आम ; आंब . ३ घोडयाच्या नाकांतून होणारा स्त्राव , मल , निर्यास . ४ नाकांतून स्त्राव होण्याचा रोग ( घोडयाचा ); शेंबा . [ सं . श्लेष्मन् ; प्रा . सिंभ ] शेंबडा , शेंबडया , शेंबडेरा - वि . १ शेंबूड असलेले ; शेंबडाने भरलेले ; चोंदलेले ( नाक ). २ शेंबडाने भरलेले नाक असलेला . ३ ( ल . ) अज्ञान ; कळत नसलेला ; अल्पवयीन . शेंबा - पु . १ घोडयाच्या नाकांतून होणारा स्त्राव . २ या स्त्रावाचा रोग . शेंबूड - पु . १ नाकांतील वाहणारा श्लेष्मा , चिकट बुळबुळीत स्त्राव , मल घाण . हा वाळून खपली धरल्यास त्यास मेकूड म्हणतात . २ ( ल . ) दिव्याची काजळी , मस . [ सं . श्लेमोदक - भाइअह १८३३ ] म्ह ० मी हसत्ये लोकां शेंबूड माझे नाका . शेंबुडांत लोळणें - ( ल . ) संसारांत गुरफटून राहणे . शेंबूड फेडणें - नाक शिंकरून टाकणे . शेंबूडकिडा - पु . ( बे . ) गोगलगाय ; पीक ; पिकळी .
-
स्त्री. शेंब पहा .
-
śēmba or śēma f Mucus of the nose, esp. as running or very moist, snivel. 2 Mucus of the intestines, esp. as voided at stool. 3 The corrupt excretion flowing from the nose of a horse: also the disease so indicated,--glanders or a form of it.
-
śēma f Preferably शेंब.
Site Search
Input language: