Dictionaries | References

घसण

   
Script: Devanagari

घसण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

घसण

  स्त्री. १ ( कों . ) व्यापारांतील , धंद्यांतील तूट , तोटा , नुकसान , घट , घस . २ अति परिचय ; घसट पहा . ३ संगत ; संघट्टण . आणि फळाचिया हांवां । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला । - ज्ञा ७ . १३९ . ऐसी पंचमहाभूतांची वेणी । त्यांत गुनत्रयाची कसणी । ऐशियाचिये घसणीं । पडियेला जो ॥ - सिसं २ . १६० . ४ संसर्ग ; स्पर्श . गगन असोनियां जनीं । मैळेना जनघसणीं । - एभा ७ . ४४४ . ५ संवय ; सराव ; - शर . ( क्रि० पडणें ; पाडणें ). ६ बैलांची गाडी उतरणीला लागली असतां चाकाला लावावयाचा लांकडाचा दांडा ; खरडी . [ सं . घर्षण ; प्रा . घसण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP