|
स्त्रीन . १ घडणें ; बनविणें ; घडण ; रचना ; विधिघटना . हें सर्व जगत ईश्वराची घटना आहे . २ हस्तकौशल्य ; कलाकुसरीचें काम . ३ प्रसंग ; बनाव ; घडणें ; उपस्थिति . काननामाजीं पडलें घटन । डोंगरारण्यीं कैचें जीवन । - दावि २८० . ४ घटणूक ; ( लग्न इ० काच्या संबंधात ) रदबदली , मध्यस्थी ; घडवून आणण्याची खटपट . बेत ; सल्लामसलत . येईल शीघ्र घटना करुनी तियेची । - र ३० . उभय पक्षांसी ऐक्य घटना साधिजेल . तुम्ही घटना कराल तर त्याचें लग्न होईल . ५ कार्याची योजना . कोणत्याही एका घटनेचा बिघाड झाला असतां तिच्या जागीं दुसरी घटना करावयाची झाली तर ... - केले १ . ४१ . ६ राज्याच्या - सभेच्या - संस्थेच्या अंतर्व्यवस्थेची - कारभाराची नियमावली ; कायदेकानू . हिंदी स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीच्या घटनेबद्दलचा हा लेख येथें संपवितों . - केले १ ४९ . ७ बनावणी ; निर्मिति ; बनण्याची क्रिया , पध्दत . ८ ( शाप . ) संयोगीकरण ; समाहार . ( इं . ) काँपोझिशन . [ सं . घट - घटना ] सामाशब्द - घटानात्मक - वि . १ विधायक ; रचनात्मक . २ बनावट , निर्मिति , घटना याबद्दलचा ; घटनेसंबंधीं . [ घटना + आत्मक ] ०दर्शकसारणी घटकसारणी - स्त्री . ( रसा . ) रासायनिक संयुक्त पदार्थ कोणत्या मूलद्रव्यांचा बनलेला आहे , ते मूल पदार्थ कसे निराळे करतां येतात इ० माहिती दर्शविणारी सारणी , आराखडा . ( इं . ) स्ट्र्कचरल फार्म्युला . [ घटना + दर्शक + सारणी = आराखडा ] ०मंडळ न. ( एखाद्या संस्थेची , सभेची , राज्यमंडळाची ) घटना तयार करण्याकरितां नेमलेलें मंडळ . [ घटना + मंडळ ] ०सादृश्य न. समधर्मता ; तुल्यजातीयता ; सममूलता ; घटनेंतील सारखेपणा . ( इं . ) होमोलोजी . [ घटना + सादृश्य ]
|