-
पु. १ अव्यवस्था ; अस्ताव्यस्तपणा ; घालमेल ( वस्तु , काम हिशेब यांत ). २ अंदाधुंदी ; घोंटाळा ; दगदग ; त्रास . ३ धांदल ; गडबड ; तारांबळ ; कां उपभोगाचे गोंधळ । - दा २ . ५ . २६ . ४ धांवाधांव ; धांवपळ ; धामधूम . ५ देवीच्या कुलधर्मात देवीप्रीत्यर्थ गोंधळी लोकांकडून करावयाचें गाणें , नाचणें , कीर्तन , देवीचें भजन , स्तुति . वेदवाचा वरदायिनी । गोंधळ गाती इयेचा । - मुआदि ४ . १२८ . ६ गडबडीचा , आरडाओरडीचा प्रकार ; कोलाहल ; धुडगूस . ( क्रि० घालणें ). [ सं . गुध = खेळणें ? सं . गुंदल = एका वाद्याचा आवाज ; तुल० का गोंदल ] ( वाप्र . )
-
०घालणें १ ( गोंधळाप्रमाणें ) अव्यवस्थितपणें वागणें , वाटेल तसें वागणें . खर्चापुरतें दिलें असतें फेंकून अन म्हटलें असतें घाला गोंधळ . - रंगराव २ धुडगूस घालणें ; गडबड करणें . गोंधळणें , गोंधळविणें - उक्रि . अव्यवस्था , घालमेल करणें ; घोळ घालणें ; एकत्र करणें ; मिसळणें . - अक्रि . १ गैरविल्हे लागणें ( वस्तु ). पोथी गोंधळली ती नीट लावतों . २ भोंवडणें ; भ्रमणें ; भोंवरा होणें ( वारा , पाणी यांचा संकुचित जागेंत ). ३ चोहोंकडे झटक्यानें फेंकलें , गुरफटलें जाणें ( गवत , धूळ ). ४ घाबरणें ; त्रेधा उडणें ; भांबावणें ; घोंटाळयांत पडणें . म्ह० गाढवांचा गोंधळ , लाथांचा सुकाळ . सामाशब्द - गोंधळलग्न - न . गोधूल लग्न पहा . गोंधळी - पु . १ देवीचा गोंधळ घालणारी जात व व्यक्ति . हे गातात , नाचतात व कोठेंकोठें वाद्येंहि वाजवितात . २ भिक्षेकर्याची एक जात . [ गोंधळ ; का . गोंदलिग ]
-
ना. अंदाधुंदा , अव्यवस्था , अस्ताव्यस्तपणा , कोलाहल , गडबड , घोटाळा , तारांबळ , दगदग , धांदल , धामधूम , धावपळ , धावाधाव , धुडगूस , हंगामा .
-
गोंधळ घालणें
Site Search
Input language: