Dictionaries | References

कोथळा

   
Script: Devanagari

कोथळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
falling out on delivery: also to the loose flabby flesh covering the belly.

कोथळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A large sack (to hold grain &c.). The chamber of the stomach, the stomach; also any chamber.

कोथळा     

ना.  कणगा , थैला , मोठे पोते ( धान्याचे );
ना.  आतडे , पिशवी ( अवयव ).

कोथळा     

 पु. १ मोठें पोतें ; थैला ( धान्याचा , दारूचा ). ' माझ्या हातांतली चूड इथल्या कोथळ्याला लावली कीं पुरें । ' - सुर्योदय १७६ . २ मोठा माणग्याचा कणगा , पालटे ( धान्य ठेवण्याचें ); मध्यें रुंद व वर निमुळतें , सामान्यत ; एका प्रकारच्या बरणीसारखें , धान्य वगैरे ठेवण्यासाठीं केलेलें मातींचे भांडें .' जैसें धान्यें कोथळ्यामध्यें साट्विती । ' - ऋ ७५ . टीप . ३ पोट . ( पक्काशय ); पोटांतील कोठा ; पोटांतील कोठ्याभोंवतालचें मांसाचें आवरण . ४ शरीरांतील कोणतीहि पिशवी , कोश जसे - अन्नाचा कोथळा ; मुत्राचा कोथळा ; मळाचा कोथळा , ' पोटी दक्षिणभागी मळाचा कोथळा । ' ५ भोत ( उशीचा ); खोळ ; अभ्रा . ६ पोट ; भोंसकल्यामुळें पोटांतुन बाहेर पडलेलें आंतडे . ७ जनावरें वितांना बाहेर पढणारी आंतंडी , गुह्रामाग ८ कंबध ; धड . ' मस्तक करूनिया भिन्न । कोथळे भुमी पाडिले .' - भुवन १४ . ४९ . ( सं . कोष्ठ + ल ; प्रा . कोत्थल .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP