-
द्रव [drava] a. a. [द्रु गतौ-भावे अप्]
-
पु. एक रस ; पदार्थांतील नैसर्गिक ओलावा , आद्र्ता , जलांश . २ पाझर ; स्त्राव ; द्राव ; गळणे ; थिबकणे . ३ वितळणे ; गालन ; द्रावण ; द्रवरुप अवस्था ( घट्ट पदार्थाची , अग्निसंयोगाने ). ४ ( ल . ) दयेचा , कोमलतेचा पाझर . वदनी अमृत घोटितां द्रव न येचि अन बापा जिला । - केका १०४ . [ सं . ] गुरुत्वमापक - गुरुत्वमापन करण्याचे यंत्र . ( इं . ) हायड्रोमीटर . द्रवण - १ द्रावण ; पातळ होणे ; वितळणे , वितळणे ; रस . द्रव होणे ; पाझरणे ; गळणे ; स्त्रवणे ( द्रावण हे कर्तरी रुप आहे . ) द्रवणे - अक्रि . १ विरघळणे ; वितळणे ; रस होणे . २ ( ल . ) दयेने हृदयास पाझर फुटणे ; अंतःकरण मृदु होणे . द्रवित - वि . १ वितळलेले ; विरघळलेले ; पातळ केलेले . २ पाझर फुटलेले ; गळलेले ; थिबकलेले ( द्रावित हे कर्मणी रुप ). द्रवीकरण - न . घट्ट पदार्थ पातळ स्थितीत आणणे . द्रवीभवन - न . वितळणे , द्रवस्थितीत येणे . द्रविभूत होणे - १ द्रव पावणे ; पातळ होणे . २ दया येणे ; मन विरघळणे अर्जुना तुझे चित्त । जर्ही जाहले द्रवीभूत । - ज्ञा २ . १८३ .
-
m Juice; exudation; fusion; the melting of pity.
-
Juice or sap; inherent moisture gen. 2 Oozing out, or the matter oozing; exudation, or an exudation; dropping, distilling, trickling. 3 Fusion or liquefaction. 4 fig. The melting of pity or tenderness.
Site Search
Input language: