|
स्त्री. १ सुर्य , ग्रह , नक्षत्र यांची दशा दाखविण्याकरितां चौरस , त्रिकोनी अथवा वर्तुळाकार भाग पाडलेली आकृति . हिचे तनु , धनु , सहज सुहृत , सुत , रिपु , जाया , मृत्यु , धर्म , कर्म , आय , व्यय असे बारा बहग भाग किंवा कोष्टकें असतात ; राशीचक्र . २ प्रक्षिप्त वाक्य दाखविण्यासाठीं काढलेला कंस व इतर रेषा . ३ ( गो .) लहान कुंडी . ४ ( खा .) वर्तुळाकार व मध्यें भोंक असलेलीं चापट चक्की , ( भोंक पाडण्यासाठी ). ५ कुंडलिनी पहा . ' हें असो तें कुडली । हृदयांआंतु आली । ' - ज्ञा ६ . २७४ . - पु . सर्प . ' त्या मणि प्रंकाशीत वारुळी । बैसले किती थोर कुंडली । ' ( नवनीत पृ . ४२१ .) कडी , वर्तळ , वेटाळें व यांसारख्यां इतर अनेक वस्तू . - वि . ज्याच्या कानम्त कुंडलें आहेत असा . ( सं .)
|