|
न. किटण पहा . पु. किडा . संबंध प्राणिशास्त्रांत हा वर्ग मोठा आहे . यास षट्पद म्हणतात . झुरळ , टोळ , माशी , पिसू , पतंग , पिंगुळ , पोरकिडा वगैरे या वर्गोत येतात . हे जल , स्थल , आकाश वगैरे सर्व ठिकाणी असतात . - ज्ञाको क ५०५ . अनेक वेगळे वेगळे . १५ ते २० भाग एकत्र जडून झालेला कीटक हा प्राणी असतो . त्यामध्यें डोकें छाती व पोटे हे तीन भाग स्पष्टपणें भिन्न असतात .- प्राणिमो ९८ . यांना शिंगें व पंख बहुधा असतात . शिंगानीं स्पर्शज्ञान होतें . अन्न शोषण्यास नळीसारखी सोंड असते , सहा पाय असतात . - प्राणी आणि आरोग्य . पृ २१ . ' कृमि कीटक पांडुसुता ' - ज्ञा १३ . २५५ . ( स .) ०भक्षी पु. किडे खाणारे सस्तन प्राणी . ०योनी स्त्री. किड्यांचा बर्ग , जात ; जीवजंतु .
|