Dictionaries | References

कसनी

   
Script: Devanagari
See also:  कसणी

कसनी     

 स्त्री. १ बांधण्याची दोरी ( एखाद्या ओझ्याची गोणीची , गठ्ठ्याची चोळीची ) बंधन ; पाश ; बंद . ' साठविले तें सांडेल झणी । यालागी कंचुकी गोणी । माजीं दाटोनी कसणी । विरडें कशी सुबद्ध । ' - मुरंशु ४८ . ' दाटले त्रिगुणाचे कसणी । कृष्णावांचोनी कोण सोडी । ' - एरुस्व ७ . ४१ . २ कसा ; लांबट व अरुंद अशी पैसे ठेवण्याची पिशवी . म्ह० ( व .) कसणी ढिलीं करावी लागेल = पैसा खर्च करावा लागेल . ३ सुताराची सामता ओढण्यासाठी काठीला दोरी बांधून केलेली धनुकली . ४ काढणी ; दोरी .
०ची  स्त्री. काचोळी . ' साड्या साउली पातळे गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथीं घेउनी सकळा कळंबावरे पळे । ' - तुगा १३३ . ( सं . कर्ष ) कसण्या - नी - अव . ( विणकाम ) ( अव ) हत्त्येच्या खिळ्या ( बाजुच्या खुंट्या ) गुड व पान ( हत्येची वरील पेटी ) यास बांधण्याच्या दोर्‍या . ( कसणी अव .)
चोळी  स्त्री. काचोळी . ' साड्या साउली पातळे गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथीं घेउनी सकळा कळंबावरे पळे । ' - तुगा १३३ . ( सं . कर्ष ) कसण्या - नी - अव . ( विणकाम ) ( अव ) हत्त्येच्या खिळ्या ( बाजुच्या खुंट्या ) गुड व पान ( हत्येची वरील पेटी ) यास बांधण्याच्या दोर्‍या . ( कसणी अव .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP