Dictionaries | References

कबज

   
Script: Devanagari

कबज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v धर, पाड, loc. case of o.

कबज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A written receipt; constipation of bowels; catching.

कबज     

 न. १ लेखी पावती , पोंच . ' ऐवज पावोन दीक्षितांची कबेज घेतलीं आहेत .' - रा १ . २९४ . ' पावले पैकियाची कबज ' - भाअ १८३४ . १३८ . २ धनकोला देण्याकरितां जप्त केलेला माल . - जप्ती , कांहिंहि माल किंवा जिंदगी यांची जप्ती . अशा रीतीनें जप्त केलेला माल ; जिंदगी ; मिळकत . ३ लेखी पावती किंवा करारनामा लिहुन दिल्यामुळे उप्तन्न होणारें बंधन ; आळा ; वचनबद्धता ; लेखामुळें , वचनामुळें गुंता . ४ पाटील - पटवारी यानें सार्‍यांच्या पोटी शेतकर्‍याला दिलेली पावती . ५ मलाव रोध ; सांखळा ; अवष्टंभ . ६ धरणें ; पकडणें ; ( बोलण्याचा ) आधार घेणें . ( विशेषतः एखाद्या मनुष्याला त्याच्या भाषणांत ). ( क्रि० धरणें , पाडणें ). ७ ताबा . कबजा पहा . ' एकमुठ असते तर आपले हातीं कबज राहता . - रा . ६ . ६०० - वि . स्वाधीन . ' सालगुदस्त किल्ले रायगड मोगलास कबज जाला .' - रा . १७ . ३८ ( अर . कब्झ ) ०करणें - जिंकणें ; ताब्यांत घेणें .
०दस्त वि.  हस्तगत ; स्वाधीन . ' मुलुख कबजदस्त केला .' - मब १०३ .
०पत्र  न. मालकी हक्क किंवा कबजा एकानें दुसर्‍याचे ताब्यांत दिल्याबद्दलचा कारारनामा . - भाअ . १८३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP