|
स्त्री. १ कमरेस बांधलेल्या ( लुगडे , धोतर इ० ) वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यांत येणारा भाग ( यांत पैसा , सुपारी इ०जिन्नस ठेवतात ), ' कडोसरी नसला तरी कनवटीला खास आहे .' - तांबे १४ . २ शरीराची ( उजवी , डावी ) जागा ; कमरेचा भाग . ३ वस्त्राच्या आवळण्यानें काळवंडलेली , वाईट झालेली कमरेची जागा . ( सामान्यत ; चतुर्थ्यत व षष्ठ्यंत स , चा इ०प्रत्यय लागून प्रयोग ). कडोसरीस खोवणें , खुपसणें , कडोसरीचा पैसा . ( स . कटि ; म , कड + सरी ; किंवा कटिवस्त्र .) ( वाप्र .) कडोसरी - सरीस येणें - अगदीं जेरीस येणें .
|