Dictionaries | References

कंदोरी

   
Script: Devanagari
See also:  कंदुरी

कंदोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A feast held by Musalmáns in honor of Fatima, Muhammad's daughter. 2 A charmed cord which women bind around their necks. 4 m A caste or an individual of it: the same with कंजारी.

कंदोरी

  स्त्री. बकर्‍याचें मांस ; सागुती ; मांसाचा नैवेद्य . ' त्या कंदुरीचीं पुष्पें जालीं ते करामत देखोन । ' - मब १०३ . ' ते गांवचे पिराला बकर्‍याची कंदुरी करतात .' - गुजा ३१ . ( फा . कंदरी )
  स्त्री. पैगंबर , महंमद याची मुलगी फातिमा हिच्या सन्मानार्थी मुसलमान लोक करतात तो भोजन समारंभ . २ ( ल .) उत्सवाचें जेवण ; भंडारा ; समाराधना .' कंदुरीं सोहळा स्वानंदाचा .' - दावि ३५३ . - ऐपो २६२ . ' शेख सल्लाची करूं कंदुरी मशीरण बोलले .' - पया . ५३ . ( फा . कंदूरी )
  स्त्री. १ ( कों .) गलबतासाठीं व इतर कामीं मोठें दोर तयार करण्यासाठीं बांधलेला लांबट सोपा - घर . २ गळ्यांत बांधावयाचा मंतरलेला दोरा . ३ करगोटा ; कडदोरा . ( का . कण्णी = दोरा ? गु . कंदोरो = कडदोरा ; करगोटा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP