Dictionaries | References

एकरंग

   
Script: Devanagari
See also:  एकरंगी , हरएकरंगी

एकरंग

 वि.  
   एकाच रंगाचा ; सर्वत्र , दोहों अंगांस एक रंग असणारा ( पागोटें , सखलाद इ० ).
   अंगावर एकच रंग असलेला ; दुसर्‍या कोणत्याहि रंगाचे ठिपके वगैरे नसलेला ; निर्भेळ रंगाचा ( घोडा ); असा घोडा कुलक्षणी , अशुभलक्षणी समजतात .
०पाठीवर   - रंग कोणता तरी एक असून पाठीवर मात्र पांढरा रंग असणारा ( घोडा ); हें अशुभ लक्षण होय . - स्त्री .
शुभ्र   - रंग कोणता तरी एक असून पाठीवर मात्र पांढरा रंग असणारा ( घोडा ); हें अशुभ लक्षण होय . - स्त्री .
   सोंगट्यांच्या तिफाशी खेळांतील डाव . प्रतिपक्ष्याची सही होण्यापूर्वी आपली सही होऊन डाव बसून पक्क्या सोंगटया उठून गेल्या व नंतर कच्च्या सोंगट्या उठून जाण्यापूर्वी प्रतिपक्ष्याची सही झाल्यास त्यास एकरंगी असें म्हणतात .
   सख्य ; स्नेह ; अविरोध ; नबाब मबसूफ व रावपंतप्रधान यांची कदीमापासोन दोस्तीएकरंगी , जुदागी नाहीं . - रा १९ ८ . पुत्रपौत्रपर्यंत एकरंग केलें . - ऐटि २ . ८० . [ एक + रंग ; फा . यक + रंगी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP