Dictionaries | References

उसंतणें

   
Script: Devanagari

उसंतणें     

उ.क्रि.  आक्रमण करणें ; उल्लंघन करणें ; पलीकडे जाणें . चाले झडझडां उसंतूनी वाट । पाहे पाळतूनी उभा तोचि नीट वो । - तुगा ११२ .
दूर करणें . परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी ॥ - ज्ञा १७ . ३११ .
थांबणें ; बंद होणें . आंग मोडामोडी । कार्यजातां अनावडी । नुसंतें परिवडी । जांभैयांची ॥ - राज्ञा १४ . १७९ .
विसांवा घेणें .
आश्रय करणें . भार्या म्हणे प्राणेश्वरा । उसंतूं नको शोकसागरा । मीं सांगेन त्या विचारा । अत्यादरे अनुष्ठी ॥ - मुआदि ३८ . २२ .
शेवटास नेणें ; पुरें करणें ; निस्तरणें . तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥ - तुगा २२०८ . योगी उसंतिती योगपंथा । - रास ५ . ९३ . [ सं . विश्रांत ; प्रा . वीसंत ; सं . उत + संधि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP