Dictionaries | References

उवायिणें

   
Script: Devanagari
See also:  उवाइणें

उवायिणें     

क्रि.  
प्रसन्न होणें ; संतोषित होणें ; आनंद पावणें . देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । - ज्ञा २ . ३५२ . ते काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें । - ज्ञा ५ . १६२ .
शांत होणें . क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । - ज्ञा ६ . २१५ .
स्पष्ट करणें ; विस्तारानें सांगणें . जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला । - ज्ञा १८ . ५१९ . तोचि सामग्रीनें उवाइला । - रंयोवा १ . ७६७ . [ सं . उप + दिशा ; प्रा . उवइस ]
स्थापन करणें ; उभारणें . मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवायिला बादरायणें । गीताप्रासादा । - ज्ञा १८ . ३३ . [ सं . उप + इ = जाणें ; उपाहित - उवाइअ + ल = उवाइल . - भाअ १८३५ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP