-
स्त्री. समुद्रकिनारा . वेल पहा .
-
पुस्त्री . १ कालविभाग ; काळ . २ आतांचा काळ व कांहीं कार्य होण्याचा काळ यांमधील अवकाश , अंतर . पेरे होण्यास अझून वेळ आहे म्हणून अधीं घरें शाकारून घ्या . ३ फुरसत ; न गुंतलेला , रिकामा वेळ . माझे पाठीसी काम आहे वेळ सापडल्यास येईन . ४ अपेक्षित किंवा योग्य कालापेक्षां जास्त काळ ; उशीर ( क्रि० लावणें , लागणें ). मला शाळेत जाण्यास वेळ झाला . वेळ लावला - ली , वेळ लागला - ली . ५ ( स्त्री . ) उशीर झाला . समय ; हंगाम ; विशिष्ट काल . ही पोथी वाचावयाची नव्हे . ६ दिवसाचा अर्ध भाग ; सकाळ किंवा दुपार . ७ तीस घटिकांच्या ( रात्री किंवा दिवसां ) आठ विभागापैकी एक . अमृत , उद्योग , काळ ( मृत्यु ), चंचळ ( चोर ), रोग , लाभ , शुभ आणि स्थिर वेळ . यांखेरीज इतर पुष्कळ प्रकारच्या वेळा आहेत , उदा० अंधेरी - घोर - घात - राक्षस - वेळ , जाती - येती वेळ इ० . ८ मुहुर्त . ९ प्रसंग ; संधी . - क्रिवि . वेळा पहा . तो दिवसास तीन वेळा जेवतो . [ सं . वेला ]
-
स्त्री. एक वनस्पति .
-
चालतां काळ
Site Search
Input language: