-
to laugh at him. Also हसायाला आहेत पोसायाला नाहीं Jeerers there are, but not one feeder.
-
v t Ridicule, deride.
-
उ.क्रि. १ हास्य , स्मित करणें . २ ( ल . ) एखाद्यास नावे ठेवणे , खोडया काढणें , उपहास करणें . ३ ( ल . ) फुटणें ; उलणें ( करंजी , गुरवळी लाडू इ० ). [ सं . ह्सन ] ( खापरानें ) हसणें - ( चुलीवर ठेवलेल्या ) वर जमलेल्या मशीनें पेट घेणें . हसता नाही पोसता नाही - अत्यंत पोरका , गरीब , सुखदुःख देणारा कोणी आप्तेष्ट नसलेला हसायला आहेत पोसायला नाही - फक्त थटटा , फजीति करणारे लोक असतात , पोटाला कोणी घालीत नाहीत . हसत हसत - हसतां हसतां दांत पाडणें - न . रागवतां चरफडतां एखाद्याची फजीती , पराभव , नाश करणे . हसत्या बरोबर हसणें , रडत्या बरोबर रडणें - वारा येईल तशी पाठ देणें . हसून गोड ( साजरे ) करणें - १ दुसर्याचा राग , विषाद , शेवटी गोडगोड शब्द बोलून घालविणे . २ गोड बोलून फसविणे . हंसतील त्यांचें दात दिसतील - लोकांनी नावें ठेवल्यास त्याची पर्वा न करणें . आपण हंसे लोकांना शेंबूड माझ्या नाकाला - दुसर्याला ज्या दोषाबद्दल हंसावयाचे तोच दुर्गुण आपणापाशी असणें हंसत गौरी , पार्वती , लक्ष्मी - स्त्री . हसतमुख , आनंदी स्त्री .
-
०चहाड वि. हंसत हंसत चहाडया करणारा .
Site Search
Input language: