Dictionaries | References

उपमिणें

   
Script: Devanagari
See also:  उपमणें

उपमिणें     

स.क्रि.  उपमा देणें ; तुलना करणें ; सारखेपणा दाखविणें . अगा तुझेनि दैवें । कवणासि उपमावें ॥ - विपू ७ . १०४ . तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥ - ज्ञा ४ . १८३ . त्यासीं उच्चै : श्रव उपमणें ॥ - वेसीस्व ८ . ११२ . - अक्रि . सारखें असणें , दिसणें ; जुळणें ; बरोबरी करणें . [ सं . उप + मा = मोजणें ]
क्रि.  उडणें ; अंतरिक्षांत वर जाणें . तेथें होमधूम्र प्रगटला । तो गगनमार्गेसी उपमला । जैसा जणउ ( जाणो ) निघाला । महादेवासी ॥ अंतरिक्षीं वीज लवे तैशी गगनीं उपमिलीं ॥ - वसा २४ . इतकें बोलुनि नारद तत्क्षणीं गगनीं उपमला ॥ - वसा ४३ . [ सं . उत + पत ; प्रा . उप्पय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP