Dictionaries | References उ उजु Script: Devanagari See also: उजुं , उजुक , उजू , उजूं , उजूबुजू Meaning Related Words उजु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( कुण . ) अजून ; पुन्हां ; आणखी ; माकत्यान . उजान पहा . रामा येतो म्हणाला पण उजुक आला नाहीं . [ हिं . अजो ; म . अजून ]वि. सरळ ; वांकडें नव्हे असें ; समसूत्रानुवर्ती ( रेषा , मार्ग इ . ). तो उजु हातिएरुं । धरो नेणें ॥ - शिशु ८९५ .नीट ; योग्य ; अनुकूल ; सीधा ( स्वभावाचा ). किंवा जैसें तें चातक । मेघां उजु करितां घोक । - स्वादि १ . २ . ८२ .सरळ ; चांगलें ; सन्मार्गवर्ति . ऋषीश्वरासिं पडलें सांकडें । कीं उजू करितां जाहलें वांकडें । - कथा ६ . ५ . ६९ . स्वैरिणीचें पाऊल उजू म्हणून चुकूनहि पडायचेंच नाहीं . - नि ७८९ .बरोबर ; प्रमाणशीर ; सरळ येणारें ; योग्य ; यथान्याय . उजु हिशेबाचे जे पैसे ते आम्ही देऊं . - कोरकि २८० .छक्केपंजे , ध्वन्यर्थ , वक्रोक्ति वगैरे नसलेलें ; सहज ; सोपें ; सुबोध ; सहज समजण्यासारखें ( भाषण , वाक्य , कविता इ० ).प्रामाणिक ; न्याय ; नि : पक्षपाती . [ सं . ऋजु ; प्रा . उज्जु ; जिप्सी उजो ]०करणें बडवून कामाला योग्य करणें ; पेटविणें ( बैल . ) - शअ . समोर ; कडे . तंवं तो धारासिंपे तिरवटें । डोळेआं उजूं ॥ - शिशु ७११ . मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजु ॥ - ज्ञा ६ . २२८ . उभा राहिला जानकी उजू । - कृमुरा १० . १२ . वीर पाहाती आकाश उजु । तों येतां देखिला तेज : पुंजु । जो ब्रह्माचा आत्मजु । नामें विख्यात नारद ॥ - जै ५१ . १५ . - क्रिवि .सरळपणें ; बरोबर ; नीट रीतीनें .योग्य बाजूस , दिशेस , मार्गास . रथियाउजू पार्थ वीर । भिमें लक्षिले गजभार ॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP