Dictionaries | References

उजळणें

   
Script: Devanagari

उजळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To burnish or furbish; to polish or shine by scouring, scrubbing, brushing. 2 To kindle, light, ignite, set on fire. 3 To illuminate or light up. Ex. हस्तखड्गें तेजें करून ॥ उजळिति नभातें ॥
To kindle, light, take fire. 2 To be brightened or lighted up--heavens on the approach of day: to become clear, clean, beaming, blooming--flushed eyes, countenance on returning health, fruits approaching to maturity.

उजळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Burnish, light up, kindle.
v i   Be brightened.

उजळणें     

स.क्रि.  
चकचकीत करणें ; जिल्हई देणें ; घांसणें ; निर्मळ , स्वच्छ करणें .
दिवे लावणें ; मशाल पेटविणें ; प्रकाश करणें ; पेटविणें ; पेट देणें . जैसा मालवलिया दिवा । प्रभेसि जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवा । तैसाचि फांके ॥ - ज्ञा १५ . ३६९ .
प्रकाशित करणें . दंत तेजें उजळोनी दिशा । हांसोनि म्हणे । - मुआदि २२ . ८८ .
स्पष्ट करणें ; सुलभ करणें . विरक्तें परमार्थ उजळावा . - दा २ . ९ . १२ .
उजळणी , आवृत्ति करणें . पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें । - दा १८ . ३ . १९ . - अक्रि .
गोरें होणें ; सतेज होणें ; सुंदर होणें . क्रमेंच तीचीं उजळेच अंगे । - सारुह २ . ५३ . उजळेना ना काळवंडेना । - दा १३ . २ . २२ .
पाडास आलेले आंबे इ० सुंदर रंगयुक्त होणें , उजळ होणें . कापुरवेलीची चोखडी । उजळिली परीवडी । - ऋ ८४ .
( उष्णादि विकारानें लाल झालेला डोळा , अंधारी रात्र ) निवळणें .
प्रकाशित होणें . जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । - ज्ञा १ . ३९ . उजळल्या दाही दिशा . - तुगा ६७८ [ सं . उज्ज्वलन ; प्रा . उज्जळण ; सिं . ओजारणु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP