|
संख्येनें अगदीं कमी ( माणसें ); अगदीं अल्प ; थोडी संख्या ( वस्तू , माणसें इ० ) या संस्थेच्या इन - मीन - तीन सभासदांपैकीं दोघे बाहेर जाणार , तेव्हां राहिलेल्या एका सभासदाच्या संस्थेचा कारभार एक मतानें व एकसूत्रीपणानें चालेल , यांत कोणालाच शंका नव्हती - सुदे २६२ . [ इनमीन सवातीन याचा संक्षेप ; ई = ही ( बायको ), न = आणि , मी = स्वत : न = आणि स = तो ( मुलगा अर्धा ), वा = अथवा ती ( मुलगी अर्धी ) = मिळून तीन माणसें ; किंवा इँ , मिँ , तिँ , = मी आणि ती - भाअ १८३२ ]
|