Dictionaries | References इ इंगळास वोळंबे लागणें Script: Devanagari Meaning Related Words इंगळास वोळंबे लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (इंगळ = अग्नि, निखारा. वोळंबा = वाळवी, तांबड्या मुंग्या) अग्नीला वाळवीने खाणें. वास्तविक वाळवी अग्नीने जाळून टाकतात पण येथे उलटी स्थिति. मोठ्याचा लहानाने पराजय करणेंसूर्याला दिवटीच्या प्रकाशानें झाकोळणें. अशक्य गोष्ट पण शक्य कोटीत येऊन वरीलप्रमाणे होणें. ‘आजि इंगळासि वोळंबे निश्र्चितीं। लागले ऐसे वाटतें।।’ -कथासा २५.१४६. ‘जेवीं बोळ हुंगेना माशी। कुढणें नये तेलापाशीं। वोळंबा न लगे अग्नीसी । तेवीं तो अर्थासी नातळे।।’-एभा २३.३४७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP