Dictionaries | References

आराइणें

   
Script: Devanagari

आराइणें

 अ.क्रि.  थांबणें ; बंद करणें ; कंटाळणें ; पुरें करणें . जे भोगितां उन्मनी । आरायेना । - ज्ञा १२ . २०९ . [ सं . अ + ऋ - आर . का . आरु = शमणें ]
 अ.क्रि.  अर्पण करणें ; अनुकूल असणें . परी सर्व प्राणें मजचिलागी । आराइले असती । - ज्ञा १ . ११० .
 क्रि.  
   धारण करणें ; धरणें . किंवा मनोभिमान धरिला । तोही आजिची सार्थ झालाजो गोपीमनें आराइला । कृष्णप्राप्तीलागीं । - रास ५ ७११ . [ प्रा . आराइअ = गृहीत , प्राप्त ]
   उत्पन्न होणें . किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं । - ज्ञा १६ . १६१ . [ सं . आ + ऋ किंवा आराध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP