Dictionaries | References

आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला।

   
Script: Devanagari

आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला।     

‘आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तयास तदनंतर भूतबाधा। चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा।।’ एखाद्या माकडाला जर प्रथम दारू पाजली व त्यांत त्याला आणखी विंचू चावला व नंतर त्यास भूतबाधा झाली तर तो किती खोड्या करील व कोणत्या प्रकारचा धिंगाणा घालील त्याचे वर्णनहि करतां येणें शक्य नाही. एखाद्या कुचेष्टेखोर अथवा खोड्याळ मनुष्याला जर अनुकूल संधि मिळाली तर त्याच्या चेष्टांस ऊत आल्याशिवाय राहात नाही. तु०-मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्र्चिकदंशनम्। तन्मध्ये भूतसंचारो यद्धातद्वा भविष्यति।। -सुर १५९.२६८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP