Dictionaries | References

आथिला

   
Script: Devanagari

आथिला

 वि.  
   भाग्यवान ; थोर . सदाभ्यासाचेनि योगें । भगवत्प्रसादप्रसंगें । लाहोनि युक्तिसौभाग्यें । आथिला होय तो । - रासपं . २ . ६०५ .
   युक्त किंवा संपन्न . ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलेनि अंत : करणें । आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥ - ज्ञा १ . ६१ . - एभा २३ . ९३७ . पुरुषचिन्हें जो आथिला । - मुआदि २३ . ११६ . शिवाय नामाथिला ( - मुआदि २१ . ४१ ) मोहाथिला ( - मुआदि २२ . २२ ) इ० रुपें आढळतात .
०लेंपण  न. संपन्नता ; थोरपणा ; भाग्य . एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेंपण मिरवी तेचि उणें । - ज्ञा ९ . ३६८ . [ सं . अस्ति ; प्रा . अत्थि ; म . आथि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP