Dictionaries | References आ आतुडणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आतुडणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To come in contact with; to touch: and, freely, to be attained, got, or found by. Ex. योगियाचे ध्यानीं ध्यातां नातुडेसी ॥ तो तूं आम्हापाशीं मागेंपुढें ॥ लपोनि जिवीं न कळे जिवा ॥ ध- रितां देवा नातुडेसी ॥ कैसी भक्ति करूं आतुडसी देवा ॥ कोण्या भावें सेवा सांग तुझी ॥ तुका म्हणे तुझे पाय आतु- डति ॥ त्या मज विपत्ति गोड देवा ॥ also गुरूभजनीं आ- तुडे ॥ ब्रह्मज्ञान विशेष पैं ॥ Rate this meaning Thank you! 👍 आतुडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. ( काव्य ) सांपडणें ; स्वाधीन होणें . कटकटा क्षुद्र मंडळांतु आंतुडलों । - पंचतंत्र १ . ३९ . ( ल . ) आकलन होणें ; समजणें . माझें मजचि वो आतुडलें गुज । - निगा ७४ . जे मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुध्दी नातुडे । - ज्ञा ५ . ६७ .लाभणें ; प्राप्त होणें ; हातीं येणें . न करितां भगवद्वक्ति । सज्ञानाहि नातुडे मुक्ती । - एभा ३ . १८६ . तो देवेंद्रपदा चढे । सुरवधूसंभोग तया आतुडे । - निमा १ . १७ . संबंध येणें ; निकट येणें ; स्पर्शणें . मां साक्षात तुं शामसुंदर । आंतुडलासी कीं । - रास १ . १०३२ . [ द्रा . आतु = धारण करणें ; जवळ असणें . ] अ.क्रि. ( महानु .) सांपडणें ; प्राप्त होणें . ' चाव्हनाचे पाये । मज आतुडती । ' अभंग . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP