-
स्त्री. निकड ; गर्दी ; दाटी . बहुतकरुनि निःशब्द । दाट न रिघे श्वापद । - ज्ञा ६ . १७६ . - पु . १ जोर . २ ( मुद्रण ) छापावयाचा फॉर्म आवळतांना द्यावयाचा कांड्यांचा दाब . - मुद्रण दर्पण २६ . - वि . १ जाड ; घट्ट ( प्रवाही , सद्रव पदार्थ ) रबराच्या झाडांतून दाट चीक निघतो तोच रबर होय . १ जाड ; बारीक , पातळ नसलेला ( कागद , फळा इ० ). ३ घट्ट विणीचे ; घटमूट ( कापड , वस्त्र इ० ). ४ गच्च ; अडच ; आवळ ; तंग होणारा ; अटस ( अंगरखा , लहान छिद्रांतील मोठी खुंटी इ० ). या छिद्रात ही खुंटी दाट होते . हा अंगरखा माझ्या अंगांत दाट होतो . ५ गडगच्च ; घनदाट ; गर्दीने , चेओआचेपीने , रेटारेटीने , खेटाखेटीने असलेला ( जनसमूह , झाडे , पाऊस , जिन्नस इ० ). ह्या झाडांची लावणी दाट झाली . ६ अखंड . जेथे आत्मा नाही दाट । तेथे अवघे सरसपाट । - दा १७ . ३ . १४ . ७ ( ल . ) अतिशय घरोब्याची ; गट्टीची ; परिचयाची ; सलगीची ; पक्की ( ओळख , मैत्री , दळणवळण , प्रेम इ० ). वार्ता दाट आली . - वाडशा २५ . ९ अतिशय ; पुष्कळ . सुगरणी गौळणी चकवाचकवी दाट । - ऐपो २४२ . दाट पराक्रम तुमचा साहेब अफाट कीर्ति । - ऐपो २६९ . - क्रिवि . बळेच ; मुद्दाम ; दाटून . - शर . [ का . दट्ट ]
-
०धमक वि. घटमूठ .
-
०धमकट वि. १ मजबूत ; धट्टाकट्टा ; बळकट ; जोमदार ( मनुष्य , शरीर इ० ) २ ऐवजदार ; सकस ; घणसर ; भरीव . [ दाट + धमकट = मजबूत ]
-
०पणा पु. १ घट्टपणा ; जाडपणा ; २ आधिक्य ; ( ल . ) अतिपरिचय . हे वोळखिचेनि दाटपणे । बहुत घडले । - ज्ञा ११ . ५५४ .
Site Search
Input language: