|
वि. न विटणारा ; पक्का ( रंग ); चवदार ; न बिघडणारें ( अन्न ). अवीट न विटे परमान्न । - भज ४२ . न बिघडणारा ; निस्तेज , खराब न होणारा ( रत्न , मणि , धातु ); कंटाळा , किळस , शिसारी नसणारा ( मुद्दाम दुष्टपणा , पापाचरण करणारा इसम ); लवकर जीर्ण न होणारें - न झिजणारें - खराब न होणारें , सुदृढ ( दागिने , भांडीं , शरीर , इमारत ); उच्छृखलपणाचें ; अमर्याद ; अविनयशीलपणाचें ( भाषण ); विपुल ; समृध्द ( पीक , धान्य ); यांखेरीज इतर पुष्कळ निरनिराळ्या अर्थानें हा शब्द योजतात , पण बहुतेक अक्षय , टिकाऊ या अर्थींच असतो . अढळ ; अच्युत ; अक्षय्य ; अनश्वर ( ईश्वराबद्दल योजतात ). धीटपणेंचि अवीट पदाप्रति नीट करुनि मन सत्वर पावा । - रत्न ८ . ऐटदार ; आकर्षक . धीट सभांतरिं नीट रिघोनि , अवीट बसे कवणास न साहे । - आसी २९ . अविट पहा . ०आवडी स्त्री. अढळ , अक्षय , श्रध्दा - प्रेम . तैसा तुका वैष्णव वीर । अवीट आवडी त्याची थोर । [ अ + वीट ]
|