-
पु. एक द्विदल धान्य . ह्याचें झाड किंवा वेल सुमारें हातभर उंच वाढतो . आकृति , रंग , वाढ , शेंग हीं सर्व उडदासारखीं असतात . मात्र मुगाची शेंग हिरवट असते . हिरवा , पिवळा व काळसर अशा मुगाच्या निरनिराळ्या जाती आहेत . मूग हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . डाळ पिवळी असून ती पथ्यकर आहे . हिचा उपयोग खिचडी , वरण , मुगदळ इ० कडे होतो . [ सं . मुद्ग ; प्रा . मुग्गो ]
-
न. मौन ; स्तब्धता ; मूकत्व . वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझे आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती । - ज्ञा १४ . ११ . [ सं . मूक ; प्रा . मूग ]
-
०आरोगणें खाणें गिळणें गिळून बसणें - ( कोणी अपमान केला असतां किंवा आपणास उत्तर द्यावयास येत नसतां , उत्तर दिल्यास अनर्थ होईल म्हणून ) न बोलतां , स्वस्थपणें , मुकाट्यानें वसणें . आरोगुनी मुग । बैसलासे जैसा बग । - तुगा १४६८ . जो कोणी पुढाकार घेईल त्याला कोणी कांहीं बोललें तरी मूग गिळावे लागतात . - पकोघे . मूक याचें प्राकृत रुप मूग हे आहे . मूग हें धान्य खाण्याचें असल्यानें मौन स्वीकारणें ह्या अर्थीं मूक ह्याचें मूग हें रुप घेऊन खाणें , गिळणें इ० धातूशीं त्याचा प्रयोग केला जातो . वास्तविक मूग धान्याचा मौनाशीं संबंध नाहीं .
-
m A grain, Phaseolus mungo.
Site Search
Input language: