-
पु. १ कडेपात ; मुक्ति मिळण्यासाठी योग्यानें कड्यावरून घेतलेली उडी ; अपराध्यास कड्यावरून लोटुन देणें ; अशी दिलेली शिक्षा . ( क्रि०करणें ). २ ( ल .) परमावधि ; शिकस्त ; अतिरेक ; कमाल ( पाऊस , पीक , संपत्ति , कृति इ०ची ), ( क्रि० होणें ). ' ही ( जॉन्सनची ) भ्रमावस्था स्थाईक होऊन मुळींच आपला बुद्धिभ्रश होईल कीं काय याची त्यास अतिशयित भीति वाटे ... पण या कडेलोटावर गोष्ट येऊन ठेपली नाही .' - नि ७०२ . ३ ( ल .) र्हास ; अधःपात ; उतरती कळा . ४ पराकाष्ठेच्या तिरस्कारानें वागविणें . ५ घालवून देणें ; काढून टाकणें ( जागा , अधिकार इ० वरून ). ६ शेवटे करणें . - वि . खालच्या प्रतीचा , दर्जाचा ; हलका ( माणुस , वस्तु ). ( कड + लोटणें )
-
पु. कड्यावरुन लोटुन देऊन मारण्याची शिक्षा . मृगुपात - राव्य . ७ . २ . ( कडा + लोटणें )
-
ना. अतिरेक , कमाल , कळस , परमावधी , पराकाष्ठा , बेसुमारी , शिकस्त .
-
.
Site Search
Input language: