Dictionaries | References

अनुयोगित्व

   
Script: Devanagari

अनुयोगित्व     

 न. अभियोग ; प्रथमचा हल्ला ; प्रथम आपण होऊन केलेली चढाई . राजकारणाच्या युध्दांत प्रजे कडे व त्यांच्या पुढार्‍याकडें केवळ प्रतियोगित्वाचा मान असतो . अनुयोगित्वाचा म्हणजे प्रारंभीची चढाई किंवा हल्ला करण्याचा मान सरकारकडें असतो .' - टिच २ . १ . ' टिळकांनी ज्या द्विदशवार्षिक युद्धांत प्रमुखपणें मरेपर्यंत भाग घेतला तें युद्ध लॉर्ड कर्झन यांनी अनुयोगित्वानें सुरू केलें व प्रजेनेंहि प्रतियोगित्वानेम तें चालु ठेवलें .' - टिच २ . ३४ . ( सं .) ( हा चुकीचा उपयोग आहे ; वास्तविक अभियोगित्व पाहिजे . अनु हा उपसर्ग पाठीमागुन होणार्‍या क्रियेला लावतात . प्रथम चढाईला अभियोग शब्द योग्य आहे तेव्हां अभियोगित्व पाहिजे .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP