|
वि. अडनीड ; अडनड ; अडनीट ; नीट किंवा बरोबर , हिशेबाच्या दृष्टीनें पूर्ण , नसलेला - दहा , वीस , शंभर इ० ठोकळ संख्येचा - परिमाणाचा नसलेला , अधल्यामधल्याच संख्येचा - गैरसोयीचा . एक रुपयाचें होईल तें भात ने किंवा मणभर ने , अडनीड अकरा पायली नेऊ नको . - क्रिवि . सोईस्कर नाहीं , अशावेळीं ; अनिश्चितपणें ; धड इकडे नाहीं , धड तिकडे नाहीं अशा तर्हेनें . आंत तरी बैस नाहींतर बाहेर तरी बैस , मध्येंच अडनीड बसूं नकोस . [ सं . अर्ध + नीत : का . नेट्टगे : ता ; निट्टु : म . नीट ]
|