Dictionaries | References

अचुंबित

   
Script: Devanagari

अचुंबित

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Unkissed. अ0 कल्पना or गोष्ट f An original device or thought.

अचुंबित

 वि.  
 क्रि.वि.  ( कों . ) अकस्मात ; अचंबीत . [ अचंबा ]
   नवीन ; साजूक . विशेष भक्तिप्रेम अचुंबित । - एभा ११ . ६८१ ; अचुंबित कल्पना - गोष्ट = अगदीं नवीन कल्पना गोष्ट .
   अपूर्व ; अदभुत . पुढें अचुंबित निरुपण । - एभा ३० . ४१३ .
   अचुक . जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळां । - ज्ञा ५ . ७ .
   स्पर्श न झालेलें ; अस्पृष्ट . जैसे वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता । - ज्ञा २ . २३२ .
   निर्भेळ ; निर्लेप . तें ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥ - ज्ञा ४ . १८९ .
   निर्मळ . तेणें श्रीकृष्णें स्तविली भक्ती । परम प्रीती अचुंबित ॥ - एभा २९ . ६४९ .
   सर्व ; अगणित . तुझ्या विभूती अचुंबिता । कृपेनें ... सांग ॥ - एभा १६ . २३४ .
   अनासक्त ; निसं : ग . परी अचुंबित वर्तणें । अघटमान कर्म करणें ॥ - एभा ३ . २९३ . [ सं . अ + चुंबित = न चुंबिलेली ; न भोगिलेली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP