-
पु. १ देवाच्या , धर्माच्या नांवानें मोकळा सोडलेला बैल ; पोळ . २ वळू ; उत्पत्तीचा बैल . ३ ( ल . ) नुसता पोसलेला गलेलठठ माणूस ; उनाड , रिकामटेकडा मुलगा ( निंदार्थी ). घरोघरी दूध लुटी । झाला सांड तुझ्या पोटी । - अमॄत २३ . [ सं . षंड प्रा . संड ; हिं सांढ ]
-
स्त्री. १ उपेक्षा ; विस्मरण . ( क्रि० करणें ). सांड कर माझी दोन दिवस स्वस्थ निजल्यानें । - प्रला १६३ . २ सोडणें ; टाकणें ; त्याग ( विषयी - करणें ). पुत्राविषयी संसाराविषयी - कामाविषयी सांड केली . ३ हरविण्याची , गमविण्याची खोड . ( क्रि० . लागणें ). काय हो , तुमच्या भावाला रुपयांची सांड लागली . ४ नांव सोडणें ; वाटेल ते करण्याची मुभा देणें . ५ टाकलेली बायको . ६ - न . हरवलेली , सांडलेली वस्तु . ७ इष्ट , बाधा इ० साठी ओंवाळून टाकावयाचा पदार्थ . म्हणती लेकरें आली भिओन । सांडी ओंवाळून सांडणें । - ह १३ . १६० . - वि . रस्तांत पडलेली ; बेवारसी ( वस्तु ). [ सं . शद् - शन्न ? सं . छर्द ; प्रा . छडड ; हिं . छांड ]
-
स्त्री. १ जास्त झालेलें पाणी काढून देण्याचा मार्ग ( बांध , भिंत इ० तून ). २ पाण्याचा दरवाजा ; उघडी ; सांडवा . ३ ( राजा . ) बांध फुटून पडणारी फट . [ सांडणें ] सांडवा , सांडोवा - पु . १ धरणाचे दार ; सांड . २ पाण्य़ाचा निकाल ; जास्त पाणी काढून देण्याची वाट . ३ कालवा ; पाट . ४ धरणाची वाट ( यावरून पावसाळ्यांत पाणी वाहते ); नदीवरला पायरस्ता .[ दे . प्रा . संदेह = पाण्यांतील पाय ठेवण्यासाठी असलेला दगड ] सांडावा - पु . सांडवा पहा .
-
स्त्री. उंटीण ; उंटांतील मादी . [ दे . प्रा संढी ] सांडण , सांडणस्वार - सांडणी , सांडणीस्वार पहा . सांडणी - स्त्री . उंटीण ; सांड . सांडणी दररोज ३०।४० कोस चालतात . - मराठी ३ रे पु . आवृ . ४ . १२८ . [ हिं . सांठनी ]
Site Search
Input language: