-
पु. बाजार किंवा दुकान . क्षेत्र म्हणिजे शेत गहन । हाट उत्पन्न द्रव्य आपण । - एभा २७ . ३७९ [ सं . आपण ; आ + पण = नाणें ( ८० कवड्यांचें ); पण = विकत देणें - घेणें ]
-
सना .
-
स्वत :; हें सर्वनाम मीं , तूं , तो , आम्ही , तुम्हीं , ते किंवा मी स्वत :, तूं स्वत :, तो स्वत :, आम्ही स्वत :, तुम्हीं स्वत : याबद्दलहि योजितात . जसें - म्या त्याला जेऊं घातलें मग आपण ( मी ) जेवावयास बसलों ; तूं मला खटपटीस लावून आपण ( तूं ) स्वस्थ बसलास ; त्यानें चोरी करावी आणि आपण ( त्यानें स्वत : ) चोर चोर म्हणून हाका मारीत सुटावें . याप्रमाणेंच अनेक वचनीं रुपे - आपण ( तुम्हीं ) येत असाल तर मी येईन इ० .
-
दरबारी भाषेंत बोलणारे राजे , सरदार , मोठे लोक , संपादक वगैरे प्रथमपुरुषीं एकवचनी बहुमानार्थानें स्वत : या अर्थी व सत्कारपूर्वक भाषणांत तूं या अर्थी आपण हा शब्द वापरतात . व संभाषणांत ज्याशीं संभाषण चाललें असेल त्याशिवाय अन्य म्हणजे तृतीय पुरुषासंबंधीं बोलतांनां एकवचनांत आपण शब्द योजतात . [ सं . आत्मन ; प्रा . अप्पणा - णे ; पं . गु . आपण ; सिं . पाण . ]
Site Search
Input language: