-
पु ( प्र . ) समारंभ . हाचि हवन संपदेचा संभ्रमु । - ज्ञा ८ . ५१ . होते श्रीकृष्णविंदान । जे संभ्रमें पर्णावी रुक्मणी । - एरुस्व १४ . ३० .
-
पु. १ भ्रांति ; गोंधळ ; घोटाळा ; गडबड ; मोह . ना तरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतला तापसु भ्रमें । - ज्ञा १ . २७१ . मग लोपिला अदभुतु । संभ्रमु तो । - ज्ञा १ . १५१ . २ औत्सुक्य ; तीव्र इच्छा ; आकांक्षा ; उत्कंठा . मग संभ्रमें दिठीसेने । घालितसे । - ज्ञा १ . १६७ . ३ आदर ; सन्मान ; स्तुती . अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहे जैसा ये व्यक्ति । - ज्ञा १३ . १८१ . नावडे लौकिक संभ्रम । यावरून डौल , नटटापटटा , ऐट ४ भ्रमण ; गरगर फिरणें ; भोवरा ; चक्राकार गति संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साठी होईल तुझ्या । - तुगा २७१३ . ५ पसारा ; अवडंबर . आणिकही नाना संभ्रम । व्रतांचे ते । - ज्ञा १८ . ९९ . ६ चूक ; हयगय ; गोंधळ ; गैरसमज . [ सं . सम् + भ्रम ] संभ्रमी - वि . सन्मान्य ; सत्कारित ; आदर केलेला संभ्रांत - वि . १ गोंधळलेला ; गडबडलेला ; घोटाळा ; उडालेला ; भ्रांतिष्ट . येतुलेया सली । सभ्रांताच्या पोटी । - ज्ञा १३ . ९०६ . २ व्यग्र ; उत्कंठित ; आवेशपूर्ण ; त्रस्त .
-
ना. गडबड . गोंधळ , घोटाळा , भ्रांती .
-
Hurry, flurry, flutter, fluster, confused and precipitate state of mind. 2 Eagerness, impetuous ardor, vehemence or forwardness of desire. Ex. कांहीं नवा पदार्थ पाहिला म्हणजे त्याचें संपा- दन करावें हा सं0 त्या मनुष्यास फार आहे. 3 S Reverencing, exalting, honoring. Ex. सदा विरक्त आणि निष्काम ॥ नावडे लौकिकसंभ्रम ॥. Hence, with the license of popular speech, An act in honoring, adorning, dressing up, delighting, gratifying &c. Ex. चक्रीदार पागोटें घालावें गंध रेखून लावावें डौलानें चालावें असे हा दिवसभर आपल्या जिवाचे स0 करीत असतो. 4 S Turning round, whirling, revolving. 5 S Error, confusion, misapprehension, bewilderment.
Site Search
Input language: