Dictionaries | References

मासा

   
Script: Devanagari

मासा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : माशा

मासा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A fish. Pr. माशाच्या पोरास पोहायास शिकवायास नको. Pr. जळांत राहून माशांसीं वैर Indulgence of hatred and hostility against all who dwell around and about us.

मासा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A fish. A weight equal to eight गुंजा.

मासा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी   Ex. माशांचा उपयोग खाण्याकरता, तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
ABILITY VERB:
पोहणे
HYPONYMY:
झिंगा रेहू पापलेट घोडमासा शिंगाडा विलोटक शार्क कातल पाडा शाल ट्राउट चांदवा चरक मासा वाम अमावट मंगुरी ईल डॉल्फिन मंगुर
MERO COMPONENT OBJECT:
काटा खवले
ONTOLOGY:
मछली (Fish)जलीय-जन्तु (Aquatic Animal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मासोळी मासळी मत्स्य
Wordnet:
asmমাছ
benমাছ
gujમાછલી
hinमछली
kanಮೀನು
kasگاڑ
kokनुस्तें
malമത്സ്യം
mniꯉꯥ
nepमाछो
oriମାଛ
panਮੱਛੀ
sanमत्स्यः
tamமீன்
telచేపలు
urdمچھلی , ماہی , حوت
noun  आठ गुंजाचे वजन   Ex. साखरपुड्याला दहा माशांची अंगठी केली
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমাষা
gujમાશા
hinमाशा
kanಮಾಶೆ
kasماشہٕ
malമാഷ
oriମସା
panਮਾਸਾ
tamஎட்டு குண்டுமணி அளவு எடை
telతులం
urdماشہ

मासा     

 पु. 
 पु. 
मीन ; मत्स्य . सपृष्ठवंश प्राण्यांपैकीं अगदीं खालच्या जातींतील प्राणी . हा नेहमीं पाण्यामध्यें राहतो . श्वासोच्छवासाकरितां कल्ले असणें हें याचें मुख्य लक्षण आहे माशांचा उपयोग खाण्याकडे , तेल व औषधी द्रव्यें काढण्याकडे करितात .
आठ गुंजांचें वजन .
( सोनारी ) माशाच्या आकाराचा सोन्याचा दागिना , पानडी . याच्या तोंडाजवळ वरील बाजूस एक टीक व खालच्या बाजूस एक टीक बसविलेली असून फासा लाविलेला असतो .
( व्यापारी , सांकेतिक ) चार आणे .
एक मुलींचा खेळ . [ सं . मत्स्य ; प्रा . मच्छ ; सिं . मच्छू ; हिं . म ( मा ) छ ; बं . माछ ; युरोपियनजि . मचो ; आर्मेनियनजि . मथसब ; पोर्तु . जि . माशे ] म्ह०
जळांत राहून माशाशीं वैर .
माशाच्या पोरास पोहावयास शिकवावयास नको . माशांचें जाळें - न .
मासे पकडण्याचें जाळें .
( ल . ) झिरझिरीत व विरळ विणीचें कापड . माशांचें विष - न . विषारी मासे चावल्यानें होणारीं दाह , सूज व ज्वर हीं लक्षणें . माशानें गिळलेलें माणिक - न . ( ल . ) एखाद्यानें गिळंकृत केलेली व पुनः परत न मिळणारी वस्तु ; कधीं न भरुन येणारी हानि . मासबाळी , मासेबाळी - स्त्री . माशाच्या आकाराचें स्त्रियांचे एक कर्णभूषण . [ मासा + बाळी ] मासळी - स्त्री .
विक्रीकरितां इ० मांडलेल्या किंवा राशिरुपानें असणार्‍या माशांचा ढीग .
लहान मासा . मासामासा - पु . एक मुलांचा खेळ . मासेगाळणा , गाळणें - वि . ( विणकाम ) अतिशय विरळ विणीचा ( ज्यांतून मासा गळेल असा ) कपडा . मासेवळण - न .
बावरलेल्या माशांच्या थव्याचें एकदम मागें फिरणें .
( जोराचा पाऊस , गढूळ पाणी इ० कारणानें होणारी ) माशांची त्रेधा , व्यग्रता , धांदल .
( ल . ) ( सामा . ) त्रेधा होऊन लगबगीनें मागें फिरणें व पळणें ; गाळण ; गडबड . वाघ पाहतां गायींचें मासेवळण झालें .
( समुदायाचा , व्यक्तीचा ) मोठा क्षोभ . मासोळी - स्त्री .
लहान मासा . मासळी अर्थ २ पहा .
माशाच्या आकाराचा पायाच्या बोटांत घालावयाचा स्त्रियांचा एक चांदीचा दागिना . ( कु . ) मासो .
अतिशय मांसल कांस ( गाय , म्हैस यांची ). मासोळी कोथिंबिरी - स्त्री . एक अलंकारविशेष . खूंटा टोप असे विशाळ झुबका मासोळि कोथिंबिरी । - अकक २ , अनंत कृत सीतास्वयंवर ४३ . मासोळीबाळी - स्त्री . मासबाळी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP