Dictionaries | References

धुणे

   
Script: Devanagari

धुणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  पाण्याने स्वच्छ करणे   Ex. नदीवर बायका कपडे धुतात
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  धुण्यासाठीचे कपडे   Ex. आज मी चार बादल्या धुणे धुतले.
 noun  पाण्याने स्वच्छ करणयाची क्रिया   Ex. धुण्याने सर्व माती निघते.
HYPONYMY:
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  पाण्याने स्वच्छ करणे   Ex. नदीवर बायका कपडे धुतात
ENTAILMENT:
HYPERNYMY:
धुणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

धुणे

  न. ( समुच्चयाने ) धुवावयाचे वस्त्र , कपडे . लोकांची धुणी धुणे - नेहमी दुसर्‍याचे दोष काढीत बसणे ; दौषेकदृष्टी असणे . ( वाप्र . ) धुणे झाडणे - कोणतेहि वस्त्र स्वच्छ धुऊन झाल्यावर ते वाळत टाकण्यापूर्वी त्याचा पिळा उलगडून , कांठ सांफ करणेझटकणे .
 स.क्रि.  १ ( पाण्याने वस्त्र , पात्र इ० ) घासून स्वच्छ करणे . २ ( ल . ) नागविणे ; उघडा करणे ; पूर्णपणे स्वच्छ , साफ करणे हे क्रियापद सकर्मक असले , तर भूतकाळी कर्त्याप्रमाणे ( जेव्हां कर्म शरीर किंवा शरीरावयव असेल तेव्हां ) सुद्धां चालते . उदा० मी हात धुतलो , पाय धुतलो , अंग धुतलो . [ सं . धू ; प्रा . धुण ; सिं . धुअणु ] धुतले जाणे - ( घर ) लुबाडले जाणे ; आंतील जिन्नस , पैसा इ० नेण्यांत येणे . माझे सर्व घर धुतले जाईल । - विवि ८ . ११ . २१० . धुतलेला तांदूळ , धुतलेले मोती - पुन . १ सुंदर , सशक्त , टवटवीत , सतेज चेहर्‍याच्या माणसास म्हणतात . २ शुद्ध ; स्वच्छ ; निर्मळ ; निर्दोष . धुतलेला विस्तव - पु . कोळशाप्रमाणे काळाकूट्ट माणूस . धुतांच जाणे - थोड्या वेळांत , दिवसांत निरुपयोगी होणे ; कमी किंमतीचा , योग्यतेचा असणे .
०पाणी  न. बायकांच्या रोजच्या गृहकृत्यांस ( व्यापकार्थी ) शब्द . कपडे धुणे , पाणी आणणे ; सारवणे इ० काम . [ सं . धू ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP