Dictionaries | References त तन्खा Script: Devanagari See also: तनखा Meaning Related Words तन्खा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तंखा . सरकारी तिजोरीतून रक्कम देण्याचा हुकूम ; वरात ; सरकारी वसुलांतून तोडून दिलेले उत्पन्न . २ प्राचीनकाळांत आदिलशहाने बसविलेली जमाबंदी , पट्टी . ही अकबराच्या कारकीर्दीत तोडरमल्ल याने पुन्हा दुरुस्त केली . मलिकंबराने केलेल्या प्रतबंदीस तनखा व भाऊंनी बसविलेल्या पट्टीस कमाल म्हणत . तनखाही हर्दू तपियाचा दिवाणांत देत नाहीस . - रा १५ . २७१ . ३ औरंगजेबाच्या कारकिर्दीत मक्केला यात्रेकरुंना नेणारी जहाजे सुरतच्या बंदरात जी असत त्यांच्या खर्चासाठी तोडून दिलेला वसूल . ४ वसूल ; एखाद्या गांवचा , परगण्याचा जमाबंदीचा , वसुलाचा तक्ता . ५ स्वामित्व ; हक्क . ६ संबंध . ( क्रि० तोडणे ; तोडून टाकणे ). त्या गृहस्थाने आपल्या बायकोचा तनखा तोडून टाकला . ७ पगार ; वेतन . ८ खर्ची . तुम्हाकडे सर्दारमुलुक बहादूर यांनी पर्गणे पालीम येथील ऐवजी तन्खा केली त्या बाबत ऐवज येणे . रा . २२ . १०१ . [ फा . तन्ख्वाह ] सामाशब्द - दास्तान - पु . वसुलाचा सांठ , गल्ला . गडोगडी तनखा , तनखादास्तान , इस्ताद आदिकरुन गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करुन ठेवावेच लागते . - मराआ ३४ . [ तनखा + फा . दाश्तन = सांठा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP