Dictionaries | References

जिंव्हार

   
Script: Devanagari
See also:  जिंव्हारी , जिव्हार , जिव्हारी

जिंव्हार     

नस्त्री . १ ( काव्य . ) हृदय ; आत्मा ; चेतनास्थान ; काळीज ; अंत : करण . भेदितें आमुचें जिव्हार । - रास ३ . ८५ . २ ( ल . ) प्राणाप्रमाणें चैतन्योत्पादक गोष्ट , तत्त्व ; मर्म ; सत्त्व . जीवनकला . जिव्हार मोडलें वैराग्याचें । - भाए ८४ . जो वेदशास्त्राचें जिव्हार । ३ जीव . शस्त्रांगीं जिव्हारें । आरोपुनी । - ज्ञा १ . २२० . ४ जीवाची गुप्त गोष्ट , रहस्य ; काळीज ; मर्म . वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें । - ज्ञा ११ . ११८ . ५ जिव्हाळा . ना तरी सकल धर्माचें माहेर । सज्जनांचें जिव्हार । - ज्ञा १ . ३१ . जिव्हाळी पहा . जिव्हारीं - क्रिवि . १ नाजुक भागीं ; मर्मी ; काळजाच्या भागीं ; अंत : करणांत ( जखम इ० ) नरपति रमणी ते खोंचलीसे जिव्हारीं । - सारुह ३ . ५७ . [ जीव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP