Dictionaries | References

जाहागीर

   
Script: Devanagari
See also:  जाहगिरी , जाहगीर , जाहागिरी

जाहागीर     

 स्त्री. १ सरकारांतून मिळालेली जमिनीची अथवा वसुलाची इनाम किंवा धर्मादाय म्हणून देणगी ही सरकारी लष्कराच्या खर्चासाठीं किंवा एखाद्या व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या पोषणासाठीं दिलेली असते . ही इनामासारखी अगदींच करविरहित नसते ; जायदाद ; इनामजमीन . २ मोंगलांनीं चार आणे मराठयांस दिल्यावर त्यांचे गावांत अगर परगण्यांत जे बारा आणे राहतात ते . ३ देवादिकांच्या नेमणुकीच्या खर्चाबद्दल गांव देतात ती . ४ ( सामा . ) पेन्शन तनखा . [ फा . जाएगीर , जागीर ] म्ह० चार खुंट जाहागीर = चार म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे . यांची जाहागीर म्हणजे पृथ्वीवर हवें तिकडे भिक्षा मागण्याची मोकळीक . ( ल . ) भिक्षावृत्ति ; भिक्षांदेही .
०अमल  पु. १ सरदेशमुखी आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . २ मोकासा आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . ३ मराठयांची चौथाई व आणखी चौथा हिस्सा ( फौजदारीसाठीं ) वजा केल्यानंतर राहणार्‍या वसुलाचा विशिष्ट भाग मोंगल सरकार कांहीं जहागिरदारांकडून घेई तो .
०दार  पु. जहागीर असलेला , मिळालेला इसम ; सरदार ; इनामदार . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP