कथा

ना.  कल्पित गोष्ट , कहाणी , गोष्ट , उचलेली गोष्ट , वर्णन , हकीकत ;
ना.  कीर्तन , प्रवचन , पुराण , हरिकीर्तन ;
ना.  लघुकथा , दीर्घकथा .
A feigned story; a tale, fable, apologue. 2 A legend of the exploits of some god related with music and singing, and with embellishing marvels invented at the moment;--forming a public entertainment. 3 Used in the sense of importance, weight, significance; as त्याची कथा काय Of what account is he? See similar words under किमत. 4 S Speech, saying, telling. कथा होणें g. of s. To live only in story; to be as a tale that is told; fuit Ilium. कथेची गति The course of a narrative or story. Ex. जेव्हां कथेची गति हे वदावी ॥ धनुष्य भंगी रसरौद्र दावी ॥
 स्त्री. १ गोष्ट ; रचलेली गोष्ट ; कल्पित गोष्ट ; कहाणी ' कथा बोलूं हे मधुर सुधाधारा । ' - र १ . २ हकीकत ; वर्णन . ' स्मरला स्मरहर भरला कंठ न वदवेचि ते कथा राहो । ' - मोसभा १ . ३३ . ३ टाळ , मृदंग , वीणा इ० साधनांनी हरिदास देवादिकांचें गुणवर्णन करतात ती ; कीर्तन देवादिकांच्या गोषटी सांगणें ; हा एक सार्वजनिकक करमणुकीचा , परमार्थ साधनाचा प्रकार आहे . ' चार्तुमासंत बहुतेक देवळांतून कथा चालतात .' ४ केलेलें कृत्य ; काम ; ( पराक्रमाचा ) प्रसंग ; पराक्रम . ' गेला माधव लोक सोडून किती गाऊं तयाच्या कथा । '; ' अशा त्याच्या कथा आहेत बाबा !' ५ ( ल .) महत्व ; वजन ; पर्वा ; मातब्बरी ( मनुष्य , वस्तु वगैरेंची ) किंमती पहा . ' तो दुसरा ब्रह्मा करील उप्तन्न । मग ऐसियाची कथा कोण । ' - नव १६ . ६८ . ' क्षुद्रा पशु पक्ष्यांची काय कथा पांचही महाभुतें । ' - विद्याप्रशंसा ( चिपळूणकर ) ७ . ६ भाषण ; म्हनणें ; सांगणें . ७ हकीकत ; ग्रंथार्थ ; विषय . ' तूं संतस्तवनीं रतसी । कथेची से न करिसी । ' - ज्ञा . ५ . १४१ . ( सं .)
०होणें   क्रि . केवळ कथेंत राहणें ; नुसती कथा बनणें ( खरें अस्तित्व नसणें ); स्मृतिरूपानें अस्तित्व असणें . कथेची गति - स्त्री . कथा सुरु , चालू असणें ; कथेचा ओघ प्रवाह . ' जेव्हां कथेची गति हे वदावी । धनुष्यभंगी रस रौद्र दावी । ' - वामन - सीता - स्वयंवर ४९ . - नुसंधान - न . वृत्तवर्णनाचा संदर्भ , संबंध ; गोष्टीची , हकीकतची संगति .
०प्रसंग  पु. १ गोष्टीचा , संभाषणाचा ओघ . २ गोष्टीतील , वर्णनांतील प्रसंग .
०बांधणें   क्रि . कथा रचणें , लिहिणें ; पद्ममय रचनेंत चरित्र लिहिणें . ' तथापि बांधेन कथा विचित्रा । ' - सारुह १ . ३० .
०भोग  पु. १ पुराण किंवा इतर ग्रंथांतील राजे वगैरेचे पराक्रम , गोष्टी , चरित्रें इ०चें वर्णन ज्यांत आहे असा भाग . २ कीर्तनांतील आख्यान ; कीर्तनाचा विषय . ३ विशिष्य प्रसंगांचें वर्णन ; हकीकत . ( सं .) - मृत - न . अमृताप्रमाणें गोड , चित्त रंजन करणारी गोष्ट . कथारस पहा . ' कलिंदिचें जीवन शुद्ध केलें । कथामृताला जग हें भुकेलें ' - वामन - हरिविलास १ . २४ . ( सं .)
०रस  पु. ( कथेंतील गोडी ) १ प्रतिपादनाची सुंदर हातोटी ; उत्तम प्रकार अलंकारादिकांनी कथाभाग सजविणें ; कथाशृंगार . ' हरिदासानें कथारस चांगला केला . ' २ साधें भगवद्‌गुणानुवाद . कीर्तन , कथा ( अलंकार इ० सजावटीविरहित ). ' कथारस काय निघाला होता ?' ( सं .) ०रूप ग्रंथ . पु . १ वर्णनांनी , हकीकतींनी भरलेली किंवा इतिहासपर ग्रंथ ; ज्यांत आख्यानें , गोष्टी आहेत असा गद्य ग्रंथ ; बखर . २ गद्यमय ग्रंथ ; प्रबंध .
०लाप  पु. वर्णन . कथा सांगणे . ' व्यापारांतर टाकूनी तव कथालापासि जे आदरी । ' - र ६ . ०वार्ता - स्त्री . गप्पा गोष्टी . ' त्या दोघी महालांत बसून परस्पर कथावार्ता करीत होत्या .' - राणी चंद्रावती १६४ .
०शेष वि.  कथारूपानें उरलेला ; स्मृतिरुपानें अवशिष्ट राहिलेला ; सत्कार्यादिरूप कथा मात्र ज्याची राहिली आहे असा ; कथेवरूनच ज्याची माहिती मिळते असा ( मृत , गत मनुष्य ). ' दुराग्रही प्रवर्तोन योग्यायोग्य कार्य न विचारतां स्वागें ; संपादित होत्साता स्थळोस्थळीं अपमान पावोन कथाशेष जाहला . - मराआ . ५ .
०संदर्भ   ( चुकीनें ) संदर्प - पु . भाषणांतील पुर्वापर संबंध , वृतवर्णनांतील संगति कथानुसंधान पहा . ( सं .)
कथा काय?
अगदी क्षुल्‍लक गोष्‍ट असणें
काहीहि महत्त्‍व नसणें
कःपदार्थ असणें
खिजगणती नसणें
पर्वा नसणें. ‘आज्ञा झाली असतां मोठ्या काळाच्या तोंडात देखील जाऊन सरकारचे पुण्यप्रतापे करून त्‍याचा बंदोबस्‍त करून येऊं. तेथे मोगलांची कथा काय?’-पेब १९.
 f  A tale. A legend of the exploits of some god, related with music and singing. Weight. Ex. (त्याची) कथा काय? Of what significance or importance? meaning worthless.

Related Words

कथा   कथा   कोल्‍हापुरा गेलो ना, कथा आयकलि ना   कथा बांधणें   कैलास विटसर कथा कर नये   कैलास विटेपर्यंत कथा करप   कथा होणें   कुणब्‍याचें पोर शहाणें झाले तर गोंधळ्याचीच कथा गाईल   जन्मांतर कथा-गोष्‍ट-हकीकत   कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान   युद्धस्य वार्ता-कथा रम्या   पोटांतील व्यथा नि घरांतील कथा   बारा गोष्टी-कथा सांगणें-करणें-गाणें   अप्रकांड कथा   कळा ना कथा, चव ना चोथा   गप्पागोष्‍टींची कथा, लोकरंजनाचा तमाशा   घरांतील कथा, पोटांतली व्यथा, कोणा सांगून येना   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   जन्मांतर कथा   सगळी रात कथा केली, काकशिणीच्या गाणीं गेली   जन्मांतर कथा   कथा कल्पतरू   चित्रकथा   तात्पर्य कथा   पुराण कथा   बृहत्कथामञ्जरी   बालकथा   मातृकथा   लोककथा   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person