ऑलिव्ह

 पु. एक फळझाड ; भूमध्यसमुद्राच्या आजूबाजूस याची लागवड होते . याच्या फळाचें तेल काढतात . कांहीं ठिकाणीं फळांचें लोणचें घालतात . फळापासून रंग तयार होतो . आलिव्हाचें पान , फांदी , माळ ख्रिस्ती लोकांत शांततेचें निदर्शक मानितात . [ इं . ]